कुंभ राशी भविष्य आजचे मराठी | Aquarius Horoscope Today in Marathi

 

कुंभ राशी भविष्य आजचे

कुंभ राशी भविष्य आजचे | Aquarius Horoscope Today in Marathi

कुंभ राशि असणाऱ्यांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या यशस्वी ठरणार आहे. परंतु काही बाबतीत आपण गोंधळू शकतात. आज तुम्हाला आळसाचा त्याग करावा लागेल अन्यथा आपले महत्त्वाचे कार्य अडकु शकतात. आज तुम्ही यश प्राप्तीसाठी अत्याधिक मेहनत घेऊ शकतात. कौटुंबिक जीवन सुख शांती ने परिपूर्ण राहील. रचनात्मक क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अधिक चांगला आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहणार आहे. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात.


प्रेम संबंधासाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुमच्या पार्टनर कडून आपणास सुख मिळू शकते व आपल्या प्रेम संबंधात अधिक वृद्धी होईल. आज आपण आपल्या जीवनसाथी ला काहीतरी गिफ्ट म्हणून देऊ शकतात. आज संध्याकाळी बागेत फिरायला जाऊ शकतात. बागेत फिरल्याने आपला दिवसभराचा थकवा निघून आपल्यात नवऊर्जेचा संचार होईल.  


कुंभ राशीत जन्मलेले लोक कसे असतात?

राशी चक्रातील 11 व्या क्रमाकांची रास कुंभ ही जगभरातील एकूण लोकसंख्येच्या 6.3% लोकांची रास आहे. पुढे आपणास कुंभ राशी विषयी महत्वाची माहीती व ही रास असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो याविषयी माहिती देत आहोत.


राशीचे तत्व - वायू

राशीचा स्वामी ग्रह - शनी

राशीचे चिन्ह - हातात घट घेतलेला पुरुष

राशीचा भाग्यशाली रंग - निळा , जांभळा , काळा , सफेद.

राशीसाठी अनुकूल राश्या - धनु , तुळ , मिथुन


कुंभ राशीतील लोक हे खुप भावुक असतात व हे लोक आपल्या भावना लपविण्यामध्ये प्रवीण असतात. कुंभ राशीतील लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. हे लोक दृढ निश्चयी स्वभावाचे असतात. व सोबतच खुप मेहनती देखील असतात. जेव्हा कुंभ राशीतील लोक कोणतेही कार्य हाती घेतात तेव्हा ते कार्य पूर्ण करूनच संतुष्ट होतात. परंतु हे लोक कोणतेही काम करण्याआधी मोठ्यांचा सल्ला नक्की घेतात. 


शनीच्या प्रभावामुळे कधी कधी कुंभ राशीतील लोक कठोर मनाने सुद्धा वागतात. या लोकांना बुद्धीमान लोकांसोबत मैत्री करायला खुप आवडते. हे लोक थोडे लाजाळू स्वभावाचे असतात. कुंभ राशीतील लोक परोपकारी स्वभावाचे असतात.


कुंभ राशी असलेले प्रसिद्ध लोक

आजवर अनेक प्रसिद्ध लोकांची रास ही कुंभ राहिलेली आहे. यापैकी कुंभ राशीचे काही विश्वप्रसिद्ध लोक पुढील प्रमाणे आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो , टाॅम हिडलस्टन, स्टेफनी बीट्रीज , वोल्फगैंग मोजार्ट , जैकी श्राॅफ , अभिषेक बच्चन , बाॅबी देओल , श्रृती हसन या प्रसिद्ध लोकांचा जन्म कुंभ राशीमध्ये झालेला आहे.


कुंभ राशीसाठी महत्वाचे उपाय

  • कुंभ राशीतील लोकांनी दर शनिवारी हनुमान चालीसा पठण करणे. 
  • कर्ज मुक्ती साठी दर शुक्रवारी श्रीसुक्त व लक्ष्मी सुक्त वाचणे. 
  • जर आरोग्य संबंधित काही समस्या असतील तर शनिवारी काळे चणे बनवून गरीब व भिकाऱ्यांना दान करणे. 
  • जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असतील तर कपाळाला गुरुवारी पिवळ्या चंदनाचा टीळा जरूर लावा. 
  • कधीही कोणत्याही मंदिराच्या बाजूने जात असाल तर नमस्कार नक्की करा. 
  • जर तुम्हाला मान - सन्मान वाढवायचा असेल तर जेवण बनवताना पहिली चपाती गाईला नक्की खायला द्या.

तर मंडळी या लेखात आम्ही आपल्यासोबत कुंभ राशीचे आजचे राशीभविष्य शेअर केले आहे. हे राशीभविष्य नियमितपणे अपडेट केले जाते. म्हणून आपले राशीभविष्य Aquarius Horoscope Today in Marathi वाचत राहण्यासाठी आपण नियमित आमच्या वेबसाइट ला भेट देऊ शकतात.

थोडे नवीन जरा जुने