कर्क राशी भविष्य आजचे मराठी | Cancer Horoscope Today in Marathi


कर्क राशी भविष्य आजचे | Cancer Horoscope Today in Marathi

आज शेजाऱ्यांसोबत व्यर्थ वादविवाद होऊ शकतो. म्हणून वादविवाद जेवढा टाळता येईल तेवढा टाळण्याचा प्रयत्न करावा. लक्षात असू द्या दुसऱ्यांच्या गोष्टीत हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, असे केल्यास तुमचा मान सन्मान कमी होऊ शकतो. योग्य राहील की आज तुम्ही इकडे तिकडे तोंड खुपसण्यापेक्षा स्वतःच्या कार्यात लक्ष द्यावे.

आज व्यवसाय संबंधी कार्यांमध्ये आपली जबाबदारी बजावण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुमचे विरोधी तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचे प्रयत्न करू शकतात. म्हणून तुम्हाला सावध रहाणे आवश्यक आहे. सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी कार्यस्थळावर आजचा दिवस चांगला राहणार आहे व तुम्हाला आज एखादे नवीन काम मिळू शकते. आपण Kark Rashi Today in Marathi राशी भविष्य वाचत आहात.

आज जीवन साथीच्या अस्वस्थतेमुळे तुम्हाला कौटुंबिक जबाबदारी स्वतःच पार पाडावी लागेल. व आपल्या जीवनसोबतीची योग्य काळजी देखील घ्यावी लागेल. तरुणांच्या प्रेम संबंधात आज वाढ होण्याची शक्यता आहे.

आज तुमच्या आरोग्य ठीक राहील. परंतु कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात तुमचा अधिक समय व्यतीत होईल.

आजचा भाग्यशाली रंग: गुलाबी 

भाग्यशाली अंक:

उपाय: आज कपाळाच्या मधोमध कुंकू चा टिळा लावावा.


कर्क राशीत जन्मलेले लोक कसे असतात?

राशी चक्रातील चौथ्या क्रमांकाची रास ही कर्क राशी आहे. आज जगभरात लोकसंख्येच्या एकूण 8.5 टक्के लोकांची राशी कर्क ही आहे.  Kark Rashi Horoscope Today in Marathi या लेखात आता आपण कर्क राशी संबंधी काही महत्वाची माहीती प्राप्त करून घेऊया...

राशीचे तत्व : जल

राशीचे स्वामी ग्रह : चंद्र

राशीचे चिन्ह : खेकडा

राशीचा भाग्यशाली रंग : चंदेरी

कर्क राशीसाठी अनुकूल राशि : मीन आणि वृश्चिक


कर्क राशीचे लोक एका नारळाप्रमाणे असतात. जे बाहेरून तर अतिशय टणक परंतु आतून अतिशय नरम स्वभावाचे असते. अनेकदा पाहण्यात आले आहे की कर्क राशीचे लोक कठीण मार्ग निवडतात आणि त्याच मार्गांवर संघर्ष करतात. तुम्ही एक उत्तम आई-वडील बनू शकतात. कारण तुमचा स्वभाव भावनाशील असतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीने दीर्घ काळापर्यंत स्मरणात ठेवण्याची शक्ती ठेवतात. कर्क राशी असणाऱ्यांची स्मरणशक्ती खूप तल्लख असते. आपण Cancer Horoscope Today in Marathi वाचत आहात.

कर्क राशि असणाऱ्या व्यक्तींच्या मूड पुन्हा पुन्हा बदलत असतो. जेव्हा प्रेम संबंधी गोष्टी येतात तेव्हा आपला स्वभाव फार कामुक असतो. कर्क राशीचे लोक एक चांगले मित्र बनतात. परंतु मित्र म्हणून निवडताना ते अनेक गोष्ट पाहतात. पण जर एकदा आपली मैत्री झाली तर ती दीर्घकाळपर्यंत दृढ राहते.

कर्क राशी असणाऱ्यांची क्षमता (Strengths) थोडक्यात सांगायचे झाले तर हे लोक स्वाभिमानी आणि सावध असतात. कर्क राशीचे व्यक्तीत्व रचनात्मक असते. तुम्ही आकर्षक स्वभावाचे असतात ज्यामुळे इतरांना तुम्ही आकर्षित करतात. स्वभावाने तुम्ही भावनाशिल, संवेदनशील आणि भावूक व्यक्ती असतात.


कर्क राशीत काही कमतरता देखील असतात. जसे अनेकदा पाहण्यात आले आहे की तुमच्यात असलेला आत्मविश्वास तुम्हाला अभिमानी आणि गर्विष्ठ बनवून टाकतो. तुमच्याजवळ एका वेळी अनेक रचनात्मक विचार असतात ज्यामुळे तुमच्या मूड नेहमी बदलत असतो. तुमच्या काल्पनिक दृष्टिकोनामुळे तुम्ही अनेकदा तर्कहीन प्रतिक्रिया देऊ लागतात. तुम्हाला हार स्वीकार नसते ज्यामुळे तुम्ही अनेकदा चुकीच्या मार्गाचा देखील अवलंब करतात. कर्क राशी असणाऱ्यांमध्ये या काही कमतरता आहेत. जर आपण यावर योग्य लक्ष दिले तर आपण स्वतः सुधारणा करणे एक उत्तम व्यक्ती बनू शकतात


कर्क राशीत जन्मलेले प्रसिद्ध लोक

आजपर्यंत जगभरातील अनेक लोक कर्क राशीत जन्मलेले आहेत. यापैकी अनेकांनी तर इतिहास घडवलेला आहे. कर्क राशीत जन्मलेले काही प्रसिद्ध लोक पुढे देण्यात आलेले आहेत.

मुकेश अंबानी, सुंदर पिचाई, रतन टाटा, अनुष्का शर्मा, लता मंगेशकर, ऐश्वर्या राय, संजीव कपूर, सुनील गावस्कर, एलोन मस्क, हरभजन सिंग, नसरुद्दीन शहा, प्रियंका चोपडा, एम एस धोनी, कॅटरिना कैफ, गौतम अडाणी, कल्पना चावला इत्यादी.


कर्क राशि साठी उपाय 

जर आपली रास कर्क असेल तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकतात. हे उपाय पुढे देत आहोत.

  • गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करून कपाळावर केसर आणि चंदनाचा टिळक लावावा. असे केल्याने तुम्हाला रोग आणि शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. सोबतच तुमचे शत्रू पक्ष देखील कमजोर होईल.
  • जर तुम्हाला धन संबंधी समस्या असेल तर सोमवारी संध्यासमयी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा पंचमुखी दिवा प्रज्वलित करावा. हा उपाय केल्याने तुम्हाला जरूर धनलाभ होईल.
  • कर्क राशी असणाऱ्यांच्या समस्या हिरा रत्न धारण केल्याने दूर होते. याशिवाय हिरा धारण केल्याने भूमी भवन संबंधी समस्या मध्ये देखील मुक्ती मिळते. परंतु या आधी आपण एकदा ज्योतिष सल्ला नक्की घ्यावी.

तर मंडळी वरील लेखात खास आपल्यासाठी कर्क राशीचे आजचे भविष्य देण्यात आलेले आहे. आशा करतो आपणास हे राशी भविष्य उपयोगाचे ठरले असेल. आमच्या वेबसाइट वरील Cancer Horoscope Today in Marathi आपण दररोज वाचून आपल्या दिवसाचे योग्य नियोजन करू शकतात.

थोडे नवीन जरा जुने