मकर राशी भविष्य आजचे | Capricorn Horoscope Today in Marathi
जर तुम्ही मागील काही दिवसांपासून तुमच्या कामांमध्ये व्यस्त असाल तर आज तुम्हाला आराम मिळणार आहे. आज सकारात्मक लोकांना भेटणे तुमच्यासाठी चांगले राहील. आजचा दिवस वैवाहिक जीवनासाठी पण चांगला असणार आहे. आज तुमचा बाहेर फिरायला जाण्याचा व मौज मस्ती करण्याचा मुड राहील. आज तुमची भेट तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्ती सोबत होऊ शकते.
आज तुमची मान - प्रतिष्ठा आधी पेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठे गुंतवणुक केली असेल तर आज तुम्हाला त्याच्यातुन फायदा होण्याची शक्यता आहे. तुमचे कोणाकडून पैसे बाकी असतील तर ते देखील तुम्हाला आज मिळण्याची शक्यता आहे.
मकर राशीत जन्मलेले लोक कसे असतात
मकर राशी ही राशीसमुहा मधील 10 व्या क्रमांकाची रास आहे. मकर राशी चा स्वामी ग्रह शनी आहे. मकर राशी ही दुर्मिळ राशी पैकी एक आहे. मकर राशी असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
राशीचे तत्व : पृथ्वी
राशीचा स्वामी ग्रह : शनि
राशीचे चिन्ह : शेळी
राशीचा भाग्यशाली रंग : हिरवा आणि काळा
राशीसाठी अनुकूल राश्या : वृषभ आणि कन्या
आपणास काम करण्याची एवढी आवड असते की ते कधी कधी कामातून वेळ न मिळाल्याने आपण आपल्या कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष करतात. परंतु असे करणे योग्य नाही. आपल्या कुटुंबाला देखील वेळ देणे तितकेच महत्वाचे आहे. मकर राशीचा स्वभाव दयाळू असतो. यामुळे समाजामध्ये मकर राशीतील लोकांची एक वेगळीच ओळख निर्माण होते. मकर राशीतील लोक हे नेहमी आपल्या उत्तम भविष्याबद्दल विचार करत असतात. आपण Makar Rashi Today in Marathi वाचत आहात.
मकर राशी असलेले प्रसिद्ध लोक
आजवर मकर राशी मध्ये अनेक प्रसिद्ध लोकांचा जन्म झाला आहे. दिपीका पादुकोण , सलमान खान , ऋतीक रोशन, विद्या बालन या प्रसिद्ध सेलेब्रिटीजची रास मकर आहे.
मकर राशीसाठी 2023 हे वर्ष कसे असेल ?
मकर राशीतील लोकांना 2023 मध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षापेक्षा या वर्षी मकर राशीतील लोकांची व्यवसाय व करियरची स्थिती चांगली राहणार आहे. या वर्षी तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणीं कडून करियर च्या बाबतीत चांगला सल्ला मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते. पण या वर्षी जर तुम्हाला गुंतवणुक करायची असेल तर विचारपूर्वक करा आणि गरज पडल्यास अन्य लोकांकडून गुंतवणुकीबाबत सल्ला घेणे तुमच्या साठी चांगले राहील.
2023 या वर्षी मकर राशीतील लोकांचे प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले असेल. या वर्षी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून वेळ आणि योग्य सन्मान मिळू शकतो.या वर्षातील काही काळ मकर राशीतील लोकांच्या प्रेम व वैवाहिक जीवनासाठी चढ-उताराचा ठरू शकतो. या वर्षी मकर राशीतील लोकांचे आरोग्य चांगले राहू शकते.
मकर राशी साठी उपाय
मकर राशी चे अधिपति शनी आहे. मकर राशी साठी काही महत्वाचे उपाय पुढील प्रमाणे आहेत.
- उत्तम फळ प्राप्तीसाठी तुम्हाला सात प्रकारचे धान्य व डाळी एकत्रित करून पक्ष्यांना खायला द्यायचे आहे.
- मकर राशी तुम्ही गडद रंगाचे कपडे घातलेले तुमच्या साठी चांगले असेल. तुम्ही जांभळे व निळ्या रंगाचे कपडे घातलेत तर ते आपल्या साठी शुभ असेल.
- नीलम, नीली किंवा शनी यंत्र घालणे देखील तुमच्या साठी चांगले असेल.
- खिशात हिरव्या रंगांचा रूमाल वापरणे, तुमच्या आर्थिक परिस्थिती साठी शुभ असेल.