धनु राशी भविष्य आजचे | Sagittarius Horoscope Today in Marathi
आज आपण ते काम करावे, जे काम केल्याने आपणास आनंद वाटतो. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तुमची मुले तुम्हाला आज घरातील कामे पूर्ण करायला मदत करतील. आज तुमची मान प्रतिष्ठा वाढू शकते. आज तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळेल . जर तुम्ही आजारी असाल तर आज तुमच्या प्रकृती मध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आज जोडीदाराशी संबंध चांगले ठेवावेत. कारण आज वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मेष राशीतील लोकांना भाग्याची साथ असणार आहे. व कोणतीतरी चांगली बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला कुठुन पैसे येणे असतील तर आज ते येऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या भावंडांची साथ मिळणार आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे. नवीन घर खरेदीचा करण्याचा प्लान देखील बनवू शकता आणि लवकरच ही इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांना देखील आज यश मिळेल. आज विद्यार्थ्यांचा अभ्यासात चांगले लक्ष केंद्रित होईल. व विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये प्रगती होईल.
धनु राशीत जन्मलेले लोक कसे असतात
जगभरात 7.3% लोकांची रास ही धनु आहे. ज्या लोकांच्या नावाची सुरूवात ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे इत्यादि अक्षरांनी होते त्यांची रास धनु ही असते.
राशीचे तत्व : अग्नि
राशीचे स्वामी ग्रह : गुरू
राशीचे चिन्ह : तिरंदाज
भाग्यशाली रंग : पिवळा, हलका निळा, क्रीम कलर
राशीसाठी अनुकूल राश्या : मेष आणि सिंह
धनु राशि असल्याने आपणास आयुष्यात धन प्राप्तीच्या अनेक वेगवेगळ्या संधी प्राप्त होतात. वेगवेगळे निर्णय घेण्याची तुमची क्षमता लोकांना चकित करते. परंतु एक पक्के ध्येय निर्धारित न केल्यास तुम्ही आयुष्यात अयशस्वी देखील होऊ शकतात. एकदा जर तुम्ही दृढ इच्छाशक्ती केली तर तुम्ही सर्वाधिक प्रेम करणारे आणि सक्षम स्वभावाचे व्यक्ती बनून जातात.
धनु राशीच्या लोकांना खुश करायचे असेल तर त्यांना संपूर्ण स्वतंत्र देणेच योग्य आहे. धनु राशीच्या लोकांना सर्व सिमांना ओलांडून स्वातंत्र्यपणाने जीवन जगायला आवडते. परंतु यामुळे त्यांना अनेकदा अपयशाचा स्वाद देखील चाखावा लागतो. परंतु कोणतेही अपयश असो, ते धनु राशीच्या लोकांना अधिक काळ निराश नाही करू शकत नाही. कठीण परिस्थितीतून तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला ओळखतात. स्वभाव, जन्म आणि तुमच्या लहानपणापासूनच तुम्ही धार्मिक स्वभावाचे असतात.
बदलत्या वेळेनुसार तुमच्या आयुष्यात अनेक नवनवीन गोष्टी घडतात. तुम्हाला आयुष्यात धनप्राप्तीच्या अनेक नवनवीन संधी प्राप्त होतात. तुम्ही उच्च शिक्षण प्राप्त करतात. धनु राशीच्या लोकांना विदेशात काम करण्याची संधी प्राप्त होते. व यामुळे त्यांना खूप आनंद देखील प्राप्त होतो.
धनु राशीचे प्रसिद्ध लोक
आजवर अनेक विश्व प्रख्यात लोकांचा जन्म धनु राशीत झालेला आहे. यामध्ये प्रतिभा पाटील, युवराज सिंग, जॉन अब्राहम, अर्जुन रामपाल, दिया मिर्झा, विश्वनाथ आनंद, रजनीकांत, सोनिया गांधी आणि सुरेश रैना इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्वांनीच मानव जातीसाठी उत्कृष्ट सेवेचा भाव प्रदर्शित केलेला आहे.
धनू राशी साठी उपाय
धनु राशी असणारे सर्वजण काही सोपे उपाय करून उत्तम फळाची प्राप्ती करू शकतात. पुढे आपणास काही सोपे उपाय देत आहोत. हे उपाय धनु राशीच्या प्रत्येक जातकाने करायला हवेत.
- प्रतिदिन सूर्य देवाला जल अर्पण आणि सूर्य उपासना करणे आपल्यासाठी उपयोगाचे ठरणार आहे.
- जर तुमच्या जीवनात बाधा येत असतील, तुम्हाला कायम समस्यांना तोंड द्यावे लागत असेल, तर यापासून सुटका मिळवण्यासाठी नेहमी पिवळ्या चंदनाची माळा परिधान करावी. किंवा तुम्ही अशी माळा आपली मंदिरात ठेऊ शकतात व दररोज या माळेची पूजा करू शकतात.
- जर तुमची तब्येत खराब राहत असेल, तर निरोगी आरोग्य प्राप्तीसाठी देवी लक्ष्मीच्या मंदिरात हलक्या रंगाचे वस्त्र अर्पण करावेत.
- आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर पाण्यात दूध व साखर मिश्रित करून दर सोमवारी चढवावे. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि धनप्राप्ती होते.
- धनु राशीच्या लोकांनी पुखराज रत्न धारण करावे. याशिवाय पाच मुखी रुद्राक्ष धारण करणे देखील आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.